Homeताज्या बातम्यालाचखोर गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळयात

लाचखोर गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळयात

लाचखोर गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळयात

बीड दि 17 फेब्रुवारी, प्रतिनिधी

खोदलेल्या विहिरीच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं.

ही कारवाई बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बालकृष्ण हनपुडे पाटील यांनी केली.

नारायण मिसाळ असे लाचखोर गटविकास अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडे बीड आणि पाटोदा या दोन्ही पंचायत समिती चा कार्यभार आहे.
तक्रारदारास गटविकास अधिकाऱ्याने विहिरीच्या कामाचे बिल काढण्यासाठी 37 हजार रुपयांची लाच मागितली होती .याची खात्री पटल्यावर बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहात पकडले.गटविकास अधिकारी मिसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे हनपुडे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:प्रलंबित खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांचे जिल्हाधिकारी यांना साकडे

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments