Homeताज्या बातम्याbeed acb लाच मागणाऱ्या ग्रामसेविका acb च्या जाळ्यात 

beed acb लाच मागणाऱ्या ग्रामसेविका acb च्या जाळ्यात 

आष्टी,

beed acb जागेच्या उताऱ्यासाठी लाच मागणाऱ्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील ग्रामसेविका सोनाली साखरे यांना बीड acb पथकाने ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

यासंदर्भात माहिती अशी कि तक्रारदार याचे वडिलांचे निधन झाले असून त्यांच्या नावावर असलेल्या  प्लॉटच्या उतार्याची तक्रारदार याने मागणी केली होती. त्याबदल्यात लोक्सेविका साखरे यांनी त्यांना 3000 रुपयांची मागणी केली होती.त्यांनी यासंदर्भात ही रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले आहे. तसेच खाजगी इसमाने ही लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड नगर परिषद गलथान कारभाराच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

लोकसेविका साखरे या पिंपळगाव घाट येथे ग्रामसेविका म्हणून काम पाहत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस आणि त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments