Homeताज्या बातम्यातब्बल ४० पैकी  ३२ नवीन कोरोना बाधित;८ सहवासित,बीड जिल्ह्यातील कोरोना कमी होईना!

तब्बल ४० पैकी  ३२ नवीन कोरोना बाधित;८ सहवासित,बीड जिल्ह्यातील कोरोना कमी होईना!

 

बीड दि 10 ,प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना संख्येत एकूण ४० कोरोना बाधितांपैकी तब्बल ३२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत तर ८ हे सह्वासित आहेत.बीड जिल्ह्यातील कोरोना मीटर कमी होताना दिसत नाही.

ही संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे.

बीड शहरात संख्या पुन्हा वाढत आहे.

आज बीड जिल्ह्यातील ५४२ व्यक्तींचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला.

त्यामध्ये ४० व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ५०२ हे निगेटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील ३२ हे नवे बाधित आहेत.

बीड जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार असल्याचे चिन्ह असताना पुन्हा हा कोरोना डोके वर काढत आहेत.

नवीन कोरोना

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई  ०४ , आष्टी,०६ बीड २४ ,गेवराई  ०१ ,केज ०१,   परळी ०१, पाटोदा०१,वडवणी ०२  असे एकूण ४०, रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड तालुक्याचा २४ इतका आहे.

आष्टी तालूक्यातील भवानीनगर कडा येथील २ कुंभेफळ येथील ३ आणि आष्टी येथील एकाचा समावेश आहे.

 

हेही वाचा:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज भंडारा येथे 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments