ऍम्ब्युलन्स ट्रक वर आदळली ; डॉक्टर सह चौघांचा मृत्यू

Ambulance truck accident ऍम्ब्युलन्स ट्रक वर आदळली ; डॉक्टर सह चौघांचा मृत्यू

धामणगाव

in article

Ambulance truck accident धामणगाव हून रुग्णवाहीका नगरकडे घेऊन जाताना ट्रॅकला दिलेल्या धडकेत् रुग्णवाहिकेतील 4 जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे.

बीड नगर रस्तावर दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ ट्रक क्र. MH 21 X 8600 हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जाऊन व्यंको कंपनीकडे डाव्या बाजुने वळन घेत असतांना पाठीमागून आलेल्या मारुती ओमणी अम्बुलन्स क्र. MH 16 Q 9507 ने सदर ट्रकला मागुन जोराची धडक दिली.या अपघातात अम्बुलन्स मधील 1) भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी (चालक), 2) मनोज पांगु तिरपुडे,  3) पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच 4) डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर  हाॅस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच 5) ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर मॅक केअर हाॅस्पीटल अहमदनगर येथे उपचार चालु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे, पोउपनि. सातव, सफौ./रोकडे, पोशि/केदार, शिरसाट, चालक पोशि/कांबळे अशांनी घटनास्थळी पोहचून जखमी व मयत यांना अहमदनगर येथे दवाखान्यात पाठविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here