कोविड बधितांना अजित कुंभार यांनी केले कोविड केंद्रात दाखल

अजित कुंभार

 

आष्टी । प्रतिनिधी

in article

बीड जिल्ह्यातील झिरो डेथ मिशन राबविण्यात कोविड बाधित नागरिकांचा मोठा अडसर निर्माण होत आहे.कोविड बाधित असलेल्या आणि घरात उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी साबलखेड येथून कोविड केंद्रात दाखल केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.आर.बी.पवार यांनी आज आष्टी तालुक्याचा दौरा केला.

 

तरच अशा गावात 8 ते 12 चे वर्ग सुरू होणार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

आष्टी येथील बैठक संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुंभार यांनी तालुक्यातील साबलखेड,खुंटेफळ,कारखेल या ठिकाणी पाहणी केली असता साबलखेड गावात पाच कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले.त्यांना तात्काळ आष्टी येथे उपचारासाठी दाखल करण्यात येऊन येथून पुढे कोणत्याही गावात पाॅझिटिव्ह रूग्ण दिसल्यास संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here