Afghanistan:काबुल आत्मघातकी स्फोटात 60 ठार ;150 जखमी
काबुल -वृत्तसंस्था
Afghanistan काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात अमेरिकी 13 नागरिकांसह 60 जण मृत्युमुखी पडले.
या घटनेचा जगातील विविध देशातून निषेध व्यक्त केला जात आहे.या घटनेचा आपण बदला घेणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी सांगितले.
Afghanistan हमीद करझाई एअरपोर्ट वर झाला बॉम्बस्फोट
Afghanistan येथील काबुल विमानतळाच्या गेट जवळ एक आणि विमानतळाच्या बाहेर एक असे दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.यामध्ये 13 अमेरिकी नागरिक असून एका सैन्य दलाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.तर उर्वरित हे काबुल मधील आहेत.
Happening Now: President Biden delivers remarks on the terror attack at Hamid Karzai International Airport, and the U.S. service members and Afghan victims killed and wounded. https://t.co/cYjfucz0Fl
— The White House (@WhiteHouse) August 26, 2021
Isis k या संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.या घटनेचा बदला घेतला जाईल असे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटले आहे.