अकोले दि 26 फेब्रुवारी,प्रतिनिधी
तालुक्यातील चिचोंडी येथील ग्रामसेवक व सरपंचांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या दालनात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे चिचोंडी ग्रामस्थांनी दिला आहे. अकोले तालुक्यात राजूर,लाडगाव,शेणित,बारी या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांनी केलेला भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असतानाच मात्र चिचोंडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांनी चिचोंडी ग्रामपंचायत मध्ये कोणालाही विश्वासात न घेता तसेच ग्रामसभा न घेता गावाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निधीचा भ्रष्टाचार केला.



