- Advertisement -
- Advertisement -
अकोले,(शांताराम काळे ) ता . २५: : आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्पकार्यालय राजूरयांच्या मार्फत इयत्ता १ ली व २री प्रवेशासाठी प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय राजूर येथे २५ फेब्रुवारी ते१०मार्च या कालावधीत अर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.तरी आदिवासी विधार्थी व पालकांनी आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे असे आव्हान आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. संतोष ठुबे यांनी केले आहे .
प्रवेश फॉर्म घेताना आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय ,शासकीय आश्रमशाळा ,शासकीय वसतिगृह येथून प्राप्त केलेलंच फॉर्म स्वीकारले जातील . झेरॉक्स फॉर्म ग्राहय धरण्यात येणार नाही हे फॉर्म विनामूल्य उपलब्ध आहेत . पालकांनी फॉर्म सोबत जन्मनोंदीचा दाखला जोडावा . सदरचे प्रवेश फॉर्म इ . १ली व २री करीत सुटीचे दिवस वगळून सकाळी ९. ४५ ते सायंकाळी ६. १५ या वेळेत उपलब्ध होतील प्रवेशाकरिता फॉर्म सोबत इच्छुक विध्यार्थ्यांच्या पालकांचा रहिवासी दाखला , पालकांचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला , तहसिलदार यांचा सन-२०२०- २१ चा उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेचा ग्रामसेवकांनी दिलेला दारिद्र्य रेषेखाली असल्याचा पालकपुरावा जोडावा. सदरचे प्रवेश फॉर्म २०२०-२१ चा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही, याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल
१ली व २ री च्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे. इयता १ली व २ री करीता शहरातील नामांकीतप्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत इंग्रजी शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे . ,
चौकट – अपुर्ण, उशीरा पाठवलेले अर्जाची निवड होणार नाही, तसेच विधार्थ्याचे पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे हमीपत्र लिहून द्यावे लागेल निवड झालेल्या विध्यार्थ्यांना शाळा बदलता येणार नाही याबाबत हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे . २०- २१ माध्येशिक्त असलेल्या अंगणवाडी शाळेतील बोनाफाई ड , अपंग , असल्यास वैध्कीय अधिकार्याचे प्रमाणपत्र फ़ोर्म सोबत जोडावे , अर्ज बिनचूक भरावा . खोटी माहिती आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल . एकदा घेतलेला प्रवेश रद्द होणार इ.
हेही वाचा:राज्यात शाळाबाह्य मुलांचे मार्च मध्ये होणार सर्वेक्षण