ahmednagar dog show नगरकरांना आज अहमदनगर मध्ये हटके शो पाहायला मिळाला तो म्हणजे श्वानांसाठी आयोजित केलेले शो.
अहमदनगर कॅनल क्लब च्या वतीने आज अहमदनगर शहरांमध्ये डॉग शोचं आयोजन करण्यात आले . यामध्ये 300 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या डॉगनी सहभाग नोंदवला.या डॉग शो चे उद्घाटन आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्तेे करण्यात आले.
डग शमधय नगरचय शवनच डक
अहमदनगर शहरातील गंगा उद्यान च्या मागे असलेल्या मैदानावर या श्वान शोचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून या डॉग शो ला विविध जातींच्या श्वानांनी गर्दी केली.
यामध्ये जर्मन शेफर्ड, अमेरिकन बुली,बुलडॉग ,डॉबरमॅन, ग्रेट डेन,पाकिस्तान बुलि, रॉटविलर, सेंट बर्नार्ड, तिबेटियन मस्टीफ, पॉमेरियन, सायबेरियन हस्की,बिगल,गोल्डन रिट्रीवर, लॅब्रेडोर रिट्रीवर, पग, मुदल हाऊंड इत्यादी जातींच्या श्वानांचा समावेश होता.
या डॉग शोमध्ये श्वान दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी करून त्याला अँटी रिबीज लसीकरण करून शो मध्ये सहभागी करण्यात येत होते. या डॉग च्या गटानुसार त्यांचे चालण्याची पद्धत, शरीराची ठेवण, त्याचे दात, संपूर्ण वाढ, आणी आणि शेपटी यांचे परीक्षण करण्यात आले.
यातून या डॉग मधील जातींची प्रतवारी तपासली जाणार आहे. या शो साठी बीड औरंगाबाद,पुणे,श्रीरामपूर येथून श्वानप्रेमी आपले श्वान घेऊन दाखल झाले होते.
तसेच या श्वानांना क्रमांक दिले जाणार आहेत.
या डॉग शोसाठी अहमदनगर कॅनल क्लब चे अध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्ष हर्षद कटारिया, सचिन क्षीरसागर, भावेश परमार यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले. या शो चे ज्युरी म्हणून अमरसिंग राजपूत, राकेश वर्मा,अरुण चौधरी यांनी काम पाहिले.