बीड
gram panchayat election निवडणुकीत उमेदवाराला धोबीपछाड करण्यासाठी तसेच जास्त मते मिळवण्यासाठी कोण काय शक्य लढवेल हे सांगता येत नाही.
सरपंच पदाच्या उमेदवाराच्या समोरचे बटन चक्क स्टिक फास्ट टाकून बंद केल्याचा प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणुकीत घडला.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच उमेदवाराच्या पुढे स्टिक फास्ट टाकून बटन बंद केल्याचा प्रकार उघडकीस आला.
संबंधित उमेदवाराने तक्रार केल्यानंतर काही काळ मतदान ठप्प झाले होते. त्यानंतर मशीन बदलण्यात आल्यानंतर मतदान सुरळीत झाले.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुपारच्या दरम्यान सरपंच पदाचे उमेदवार असलेले गणेश वाणी यांच्या नावासमोरील बटनावर अज्ञात व्यक्तीने स्टिक फास्ट टाकून हे बटन बंद केले होते.
दरम्यान ही बाब उघडकीस आल्यानंतर या केंद्रातील मतदान काही काळासाठी बंद ठेवण्यात आहे.
त्यानंतर मतदान मशीन बदलण्यात आहे. याबाबतची माहिती तहसीलदार यांच्यासह उपविभागीय अधिकारी यांना कळविण्यात आली .
या मशीनची तपासणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान सरपंच पदाचे उमेदवार गणेश वाणी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.