शिरूर तालुक्यात गुरूवारी परतीच्या पावसाने 4 जणांचा बळी

- Advertisement -
- Advertisement -

शिरूर

shirur kasar news   बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गुरूवारी परतीच्या पावसाने 4 जणांचा बळी घेतला. दोन मुली एक तरूण नदीत वाहून गेले तर एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने तालुका हळहळला.

घटनास्थळी तहसिलदार श्रीराम बेंडे,पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पवार दाखल झाले.दोन्ही मुलीचे मृतदेह सापडले मात्र एका मृतदेहाचा शोध सुरूच आहे.

सासूचे २५ तोळ्याचे दागिने चोरताना जावई cctv त कैद

beed news मिळालेल्या माहितीनुसार रायमोह जवळील भानकवाडी येथील स्वरा कुंडलीक सोनसळे (१२ ) वर्षीय तर छकुली कुंडलीक सोनसळे ( ९) वर्षीय सख्या बहिणी आपल्या शेतात गेल्या होत्या.मात्र दुपारी जोराचा पाऊस सुरू झाल्याने त्या घरी परतत असताना भानकवाडी जवळून वाहत असलेल्या रौंद नदी भानकवाडी ते खरगवाडी दरम्यान पूर आला आणि या मुली पाण्यात वाहवल्या.beed news live

त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचेकडे आलेला नातेवाईक पाहुणा साईनाथ भोसले शिरसमार्ग येथील हा तीस वर्षीय तरूण देखील त्यांना वाचवण्यात अपयशी ठरला व तो देखील वाहून जिवाला मुकला असल्याची दुर्दैवी घटना घडली.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत जाधव तसेच अशोक जाधव यांनी घटनास्थळावरून प्रत्यक्ष पाहणी करून माहिती दिली.

वीज पडून एकाचा मृत्यू beed rainfall today
भानकवाडी पासून जवळच असलेल्या दगडवाडी शिवारात रावसाहेब जायभाये वय ५५ हा शेतकरी शेतात काम करत असतांनाच विज अंगावर पडून जागीच मृत्यू पावला असल्याचीही अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

मुलींचे मृतदेह सापडले साईनाथचा शोध सुरू
वाहून गेलेल्या दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत.साईनाथचा शोध सुरू असून घटनास्थळी एन.डी. आर.एफ.ची टिम बोलावलण्यात आल्याची माहिती तहसिलदार श्रीराम बेंडे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles