teachers day 2022 in beed शिक्षक दिनानिमित्त बीड जिल्ह्यात 22 शिक्षकांना जिल्हा  शिक्षक पुरस्कार प्रदान

- Advertisement -
- Advertisement -

 

बीड

teachers day 2022 in beed शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने झालेल्या सोहळ्या मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शाळातील 11, माध्यमिक विद्यालयांमधील 10 शिक्षकांना व एक विशेष शिक्षक पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षण
जिल्हा परिषद शिक्षण

जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदर पुरस्कार वितरण सोहळ्या मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक असे प्राथमिक शाळातील 11 शिक्षकांना तर दहा तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांमधील 10 शिक्षकांना व एक विशेष शिक्षक दिव्यांग असे पुरस्कार , सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ प्रदान करून गौरवण्यात आले.

happy teachers day 2022
happy teachers day 2022

जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले. विद्यार्थी आणि राष्ट्र घडविण्याचे पवित्र काम शिक्षक पार पाडतात. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार बहुसंख्येने असलेला जिल्हा आहे. येथे अनेक अडथळे व अडचणीतून विद्यार्थ्याला शाळेपर्यंत आणावे लागते, अशा परिस्थितीतून त्याला घडवावे लागते. अशा स्थितीत देखील जिल्ह्यात चांगले काम होत आहे. विविध क्षेत्रात विकास होण्यासाठी असे अनेक समस्यांवर काम करावे लागणार आहे.

यामध्ये बालविवाह प्रतिबंध,  स्त्री भृण हत्या या अनेक सामाजिक विषयांमध्ये देखील शिक्षक हे जनजागृती च्या माध्यमातून योगदान येण्यासाठी पुढे यावे. जवळपास 98% शिक्षक happy teachers day 2022 चांगले काम करत असल्याचे येथे सांगितले गेले आहे. यातून शिक्षणासाठी असलेले तळमळ दिसून येत आहे. गुरु शिवाय चांगले जीवन घडू शकत नाही, अगदी राम व कृष्ण  हे देव देखील विद्यार्जन करण्यासाठी गुरूंकडे गेले होते असे श्री ठाकूर म्हणाले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यावेळी म्हणाले , विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी खेळ, छंद पद्धतीचा वापर करण्यासाठी अष्टपैलू व्हावे. सध्या स्थितीमध्ये जग वेगात बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव तंत्रज्ञानामध्ये झालेला आहे. आपल्या यंत्रणेतील ग्रामसेवक , शिक्षक, तलाठी यांना देखील या स्पर्धेत आधुनिकतेची कास धरावी लागेल .

teachers day wishes
teachers day wishes

विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांना देखील स्वतः सतत अभ्यास करून उत्तुंग यश मिळविणारे विद्यार्थी घडवावे लागतील, जे पुढे 25 -30 वर्षांनंतर देखील  त्यांच्या आशीर्वाद साठी त्यांच्याकडे येतील.

teachers day 2022 in beed शिक्षकाच्या प्रयत्नाने घडला अविनाश साबळे

विद्यार्थी घडविणाऱ्या परिस्थितीबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार म्हणाले, यासाठी शिक्षक, पालक व परिस्थिती हे घटक महत्त्वाचे ठरतात .  राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या मांडवा येथील अविनाश साबळे याचा गावात भेट दिल्यावर हे जाणवले आहे. जिल्हा परिषद शिक्षकाच्या मार्गदर्शनातून हा विद्यार्थी घडला असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, पण 1978 सालातील ती परिस्थिती आजही आठवते, .मी स्वतः सनदी अधिकारी होण्यापूर्वी शालेय जीवनात एक अवखळ विद्यार्थी होतो, जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या माध्यमातून मी घडलो. दहावीला शिक्षकांनी आम्हाला घडविण्यासाठी घेतलेले कष्ट आठवतात. happy teachers day images 2022  खेळासाठी सुविधा नसताना आमची तयारी करून घेणारे शिक्षकांचे योगदान बहुमोल आहे. जे आजही आम्हाला स्पर्धेत पुढे ठेवते. अशा विविध आठवणी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी यावेळी सांगितल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री कुलकर्णी यांनी केले. राष्ट्र उभारणीच्या कामात पवित्र योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. पुरस्कार है प्रातिनिधिक  स्वरूपात जिल्ह्यातील 23 हजार शिक्षकां पैकी 22 जणांना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जवळपास सहा लाख विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सर्वच शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे असे सांगितले.

happy teachers day images 2022
happy teachers day images 2022

कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून व शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत गायनाने झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने डोंगर किन्ही येथील माध्यमिक शिक्षक श्री वि.भा. साळुंखे व ढेकनमोहा येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती उषा ढेरे happy teachers day wishes  यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री प्रमोद काळे, डॉ.ज्ञानोबा मोकाटे, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, गौतम चोपडे यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक त्यांचे कुटुंबीय, शासकीय अधिकारी -कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार, ऋषिकेश शेळके, विठ्ठल राठोड, हिरालाल कराड, आसाराम काशीद, राऊत साहेब , महादेव चव्हाण, संजय जाधव,  गिरीश बिजलवाड आदींचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री राजेश पवार व शिक्षिका श्री शैलजा ओव्हाळ यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला अविनाश साबळे शी संवाद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles