तोफखानाचा कलेक्टर acb च्या जाळ्यात

नगर
तोफखाना पोलीस ठाण्याचा कर्मचारी शैलेश गोमसाळे (कलेक्टर) यासह खासगी व्यक्तीस 30,000 रुपयांची लाच घेताना नाशिकच्या acb ने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आलोसे पो ना गोमसाळे यांनी आरोपी खाजगी व्यक्ती वैभव याचे मार्फतीने दरमहा ३०,०००/- रु. हफ्ता घेण्याचे मान्य करून, आरोपी खाजगी इसम वैभव यांचे मार्फत ३०,०००/- ₹ लाचेची रक्कम आरोपी खाजगी इसम वैभव यांनी स्वतः आलोसे गोमसाळे यांच्या वतीने सिटी स्टोअर, पाईप लाईन रोड, एकविरा चौक, अहमदनगर येथे स्वीकारली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई नाशिकच्या अँन्टी करप्शन ब्युरो,पोलीस निरीक्षक श्रीमती साधना इंगळे यांच्यासह पथकाने केली.
हा कर्मचारी तोफखाना पोलीस ठाण्यासाठी हप्ता गोळा करत असल्याचे कळते.हा कलेक्टर जाळ्यात अडकल्याने धाबे दणाणले आहेत.

in article

 

Sanjay raut latest update शिवसेना खासदार इडीच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here