Sanjay raut latest update शिवसेना खासदार इडीच्या ताब्यात

Sanjay raut latest update
Sanjay raut latest update

 

मुंबई,

in article

Sanjay raut latest update शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले  आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले  असून त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार आहेत.

तिथे त्यांची आणखी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राऊतांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.

दुसरीकडे मुंबईतील ईडीच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऑफिसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चुकलो असे वाटत असेल तर तुम्हाला मातोश्रीचे दारे उघडे-आदित्य ठाकरे

कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांची आज सकाळी सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

ईडीचे अधिकारी दारात आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांना घरी येण्याचं कारण विचारलं. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मी चौकशीला येतो, असं सांगूनही तुम्ही आज येण्याचं कारण काय?, असा सवाल त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी राऊतांना छापेमारीचं कारण सांगितलं.

Sanjay raut latest update

तुम्ही ईडीला सहकार्य करत नसल्याने आज आम्ही चौकशीसाठी आलो आहोत, असं उत्तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलं. दरम्यान संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास तू तू मैं मैं झालं. अखेर ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरात पोहोचले अन् चौकशीला सुरुवात केली.

काही वेळापूर्वीच ईडीचे दिल्लीतील केंद्रीय अधिकारी हे मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात आहेत.

आता संजय राऊत यांना याठिकाणी चौकशीसाठी आणलं जाणार आहे.त्यानंतर ईडीचे वरिष्ठ अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करु शकतात. या पार्श्वभूमीवर सध्या ईडीच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला जात आहे. ईडीच्या कार्यालयाकडे येणारे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.

याठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात आणल्यास याठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. यादृष्टीने ईडीच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला जात आहे. मात्र, या सगळ्याची एकूण दिशा पाहता ईडीकडून संजय राऊत यांना अटक केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here