Homeताज्या बातम्याSolapur news : सोलापूर जिल्ह्यात तीन जणांचा बुडून मृत्यू

Solapur news : सोलापूर जिल्ह्यात तीन जणांचा बुडून मृत्यू

 

सोलापूर

Solapur news : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शेटफळ येथे शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता.मोहोळ) येथे सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

माचणुर (ता.मंगळवेढा) येथील निकम कुटुंब हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याचा शेतात सालाने कामाला आहेत. तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब आहे, सोमवारी डोंगरे यांच्या शेतामध्ये डाळिंब तोडणीचे काम सुरू होते दरम्यान कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम हे तिन्ही बालके शेततळ्याच्या शेजारी खेळत होती, ते बराच वेळ दिसली नाहीत, त्यांचा शोध घेतला असता शेततळ्यात पडल्याचे दिसून आले.

त्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. हि घटना पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments