Ncp shard pawar अयोध्या दौरा राष्ट्रीय प्रश्न नाही : शरद पवार

Ncp shard pawar

कोल्हापूर

Ncp shard pawar राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी मनसे चे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर नाव न घेता टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ओबीसी आरक्षण आहे. त्या ठिकाणी‌ओबीसी उमेदवार देणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
त्यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार
आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं हे सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढणार का हा प्रश्न उपस्थित होतो. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.
प्रत्येकानं आपापल्या चिन्हावर लढावी, असं काहीजण म्हणत आहेत. तर आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे एकत्र निवडणूक लढवावी असंही काहींचं मत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक 15 दिवसात जाहीर करा हा गैरसमज आहे. मला वाटतं या निवडणूक प्रक्रीयेला दोन-अडीच महिने लागतील. जिथं थांबवलं तिथून सुरू, करा असा आदेश असल्याचं पवार यांनी सांगितलं.

in article

कोर्टाच्या कोणत्याही बाबींवर खूप बोलण्यासारखं आहे. पण तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही येईल, असं शरद पवार म्हणाले. केंद्राकडून राज्य सरकारला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असं सांगून शरद पवार म्हणाले लोक सगळ्याचं योग्यवेळी उत्तर देतील.कोणाचाही अयोध्या दौरा हा कोणाचाही राष्ट्रीय प्रश्न नाही.
महागाईचे प्रश्न नीट सोडवले जात नाहीत, त्यामुळे राजकीय प्रश्न पुढे येतात धार्मिक गोष्टींचं राजकारण होतं, असंही शरद पवार म्हणाले.
एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना जामीन मिळतो. मात्र राष्ट्रवादीच्या अनिल
देशमुख किंवा नवाब मलिक यांना जामीन नाकारण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन
लढतीत भाजपा महाविकास आघाडीपेक्षा वरचढ ठरत आहे का?, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.
“कोर्टाच्या निर्णयावर कशाला भाष्य करायचं?बोलण्यासारखं खूप आहे. पण उद्या तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल”, असं पवारांनी उत्तर दिलं.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावेळी राजद्रोहाच्या कलमात बदल करण्यासंदर्भातही आपली भूमिका मांडली.
“राजद्रोहाचं कलम १८९० साली इंग्रजांनी आणलं होतं. पूर्वीच्या काळी राजाविरोधात
कोणी आवाज उठवला तर या कलमाचा वापर केला जात असे. मात्र आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे हे कलम आता कालबाह्य असल्याची भूमिका मी
मांडली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानंही याबाबत भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारने आम्ही या कलमाचा फेरविचार करणार आहोत असं म्हटलं आहे, असं असेल तर ही चांगली बाब आहे”, असं शरद पवार म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर शिवसेना आणि मनसेमध्ये कुरघोडी पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एका
वाक्यात उत्तर देत राज ठाकरेंचं नाव न घेता
टोला लगावला. “अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“कोण अयोध्येला जातंय हे मला माहित नाही. पण देशात महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल- डिझेलचे वाढते दर हेच खरे भेडसावणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवले जात नाहीत. देशाची सुत्रं आज ज्यांच्या हातात आहेत ते लोक आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माझा नातू रोहित पवार देखील अयोध्या
दौऱ्यावर आहे हे मलाही माहित नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले.

१५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश नाहीत .सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले नाहीत हे स्पष्ट करताना शरद पवार यांनी कोर्टाचा नेमका निकाल यावेळी सांगितला.
“१५ दिवसांत निवडणुका घ्या असं कोर्टानं म्हटलेलं नाही. निवडणूक प्रक्रीयेसाठीच्या तयारीला १५ दिवसांत सुरुवात करा असं कोर्टानं सांगितलं आहे”, असं शरद
पवार यांनी स्पष्ट केलं.

 

निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी सांगितलं.
“निवडणुकांबाबत राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here