नाशिक येथे आर्मी कॉम्बेक्ट एव्हीएशन च्या प्रशिक्षणार्थींना विंग्ज प्रदान
नाशिक दि 29 डिसेंबर/प्रतिनिधी
नाशिक येथे आर्मी कॉम्बेक्ट एव्हीएशन च्या प्रशिक्षणार्थींना शानदार कार्यक्रमात विग्ज प्रदान करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या विविध कारवायातील यशाचा अविभाज्य भाग मानल्या जाणाऱ्या आर्मी कॉम्बेक्ट एव्हीएशन म्हणजे च युद्ध विमान चालक प्रशिक्षणार्थीच्या 34 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ कोरोना चे नियम पाळून नाशिक जवळच्या गांधीनगर एअर फिल्ड येथे संपन्न झाला.
लष्करातील ध्रुव, चित्ता, चेतक ,या सह विविध प्रकारची हेलिकॉप्टर चालविण्याचे प्रशिक्षण या केंद्रात देण्यात येते. आकाशातून टेहळणी करून शत्रूचा ठावठिकाणा भूदलाला तोफखान्याला देऊन शत्रूला नेस्तनाबूत करण्याचं काम हे दल करते .तसेच शत्रूच्या अतिरेक्यांच्या ठिकाणा जवळ सैन्य तुकड्या उतरविणे लहान तोफा, जीप आदी शस्त्र सामुग्री उतरवून मोहीम फत्ते करणं, मोहीम झाल्यावर आपल्या सैनिकांना शत्रू प्रदेशातून सुखरूप परत आणणे, वेळ प्रसंगी पूर भूकंपा सारख्या नैसर्गिक आपत्ती मध्ये अडकलेल्या जनतेला सुखरूप बाहेर काढण्याच कार्य देखील हे दल करते.
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजच्या समारंभात हवाई कसरती व प्रात्यक्षिक रद्द करण्यात आली. आजच्या समारंभात प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या 33 अधिकाऱ्यांना एव्हीएशन विंग्ज देऊन सन्मानित करण्यात आले.
समारंभाचे अध्यक्ष मेजर जनरल ए के सूरी हे होते. प्रशिक्षण काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सन्मान चिन्ह देण्यात आली. त्यामध्ये कॅप्टन संतोष कुमार सौरापल्ली यांना प्रथम क्रमांकाचे सिल्व्हर चित्ता सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर कॅप्टन तारिफ सिह यांना बेस्ट इन फ्लाईंग करिता के एस शर्मा मेमोरियल ट्रॉफी आणि कॅप्टन बी प्रभू देवन बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट कॅप्टन सचिन गुलीया, कॅप्टन दिवाकर ब्रम्हचारी यांना विविध विषयांत प्राविण्य मिळविण्यासाठी सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा:केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे शेतकरी खुश.
Ja naprawdę skarb twoją dzieło, Świetny post test na covid 19 test na covid 19.