hiware bazar,तंटामुक्त समाज निर्माण करण्याची गरज

- Advertisement -
- Advertisement -

 

 

नगर:-
hiware bazar,तंटामुक गावच नाही तर  तंटामुक्त समाज निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सुधाकर यार्लगड्डा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी हिवरे बाजार येथील कायदेविषयक जनजागृती शिबिरात केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार अखिल भारतीय कायदेविषयक जनजागृती  अभियान अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि ग्रामपंचायत हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने सदरचे अभियान राबविले जात आहे.

श्री.यार्लगड्डा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कायदा कशासाठी बनवला जातो.कायदा कसा तयार केला जातो,कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते,कायद्याच्या ज्ञानाची गरज आहे का याची माहिती दिली तसेच एखाद्या व्यक्तीस पकडून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास आवश्यकता असल्यास मोफत सल्ला,मदत,विधिज्ञ कसे दिले जातात तसेच वंचितांना त्यांचे कायदेविषयक हक्क व अधिकार कसे समजावून सांगितले पाहिजेत यावर महत्वाचे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.सुधाकर यार्लगड्डा यांनी भूषविले.पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्क्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य,रेवती देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,अॅड श्री.सुभाष काकडे अध्यक्ष सेन्ट्रल बार असोसिएशन, अॅडभूषण ब-हाटे अध्यक्ष बार असोसिएशन, अॅड सतीष पाटील जिल्हा सरकारी वकील ,निखील  ओसवाल उप मु.का.अ.जिल्हा परिषद अहमदनगर,श्रीमती  होजगे गटविकास अधिकारी पंचायत समिती नगर ,विमलताई ठाणगे सरपंच हिवरे बाजार,चंद्रकांत  खाडे विस्तार अधिकारी हे उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावपातळीवर तंटामुक्त समितीद्वारे तडजोड तसेच मध्यस्थी करून वाद कसे मिटवता येवू शकतात,तसेच गावातील जास्तीत जास्त वाद गावातच मिटवून आवश्यकता असल्यास न्यायालयाच्या योजनेच्या माध्यमातून कसा फायदा घेता येतो,तसेच गावात वेगवेगळ्या योजना राबवून त्या यशस्वी कसा केल्या,गावातील वाद,तंटे सामोपचाराने कसे सोडवता येतात या बाबत मार्गदर्शन केले.

hiware bazar,आदर्श गावात कायदेविषयक जनजागृती

अॅड काकडे  यांनी शिक्षणाचे अधिकार बाबत व्याख्यान केले त्यांनी शिक्षणाबाबत तसेच आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच यांची ओळख करून दिली.तसेच शिक्षणाचे हक्क व अधिकार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

निखील ओस्तवाल यांनी  जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये विधी सेवा प्राधिकरण सोबत समनव्य साधून कायदेविषयक शिबिरातून माहिती देणार असल्याचे सांगितले.वंचित लोकांना न्यायालयाच्या कार्यपद्धतीची माहिती नसते.त्यासाठी अशा प्रकारच्या माध्यमातून प्रत्येक गावात जास्तीत जास्त लोकापर्यत कायद्याचे ज्ञान पोहचले पाहिजे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदत करत असल्याचे सांगितले.

सर्व मान्यवरांनी गावातील विविध विकास कामाची पाहणी केली व माहिती घेतली.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्र हिवरे बाजार येथे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

राज्यसभा सदस्य रजनी पाटील:अति मुसळधार पावसाने बाधित गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवादराज्यसभा सदस्य रजनी पाटील:अति मुसळधार पावसाने बाधित गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles