राज्यसभा सदस्य रजनी पाटील पावसाने बाधित शेतकऱ्यांशी संवाद

राज्यसभा सदस्य रजनी पाटील

 

 

in article

केज,

 

राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांनी बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील अति मुसळधार पावसाने बाधित झालेल्या गावातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

 

बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई तालुक्यात अति मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले.

केज आणि आंबेजोगाई तालुक्यातील सावळेश्वर ,पैठण, इस्थळ ,अपेगाव, सौंदाणा या गावांना भेट देऊन पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.प्रत्येक बाधित गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि नुकसान याची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,आदित्य पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यसभा सदस्य रजनी पाटील

त्यांनी सांगितले की, या संदर्भात राज्य सरकार कडे विनंती आहे की , आता पंचनामे करण्याची वेळ राहिली नाही , ताबडतोब सरसकट नुकसान भरपाई  शेतकऱ्यांना दिली पाहिजे.अशा प्रकारचे अस्मानी  संकट पहिल्यांदाच मांजरा नदी काठच्या गावांवर ओढवले आहे.सरकार ने तात्काळ मदत घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

आणखी वाचा : ३१ रुग्णवाहिकेचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here