KKR vs PBKS IPL 2021,केएल राहुलच्या आक्रमक फलंदाजीने पंजाब किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सवर विजय.

- Advertisement -
- Advertisement -

 

अबू धाबी (गौरव डेंगळे,२/१०)

KKR vs PBKS IPL 2021,आयपीएल २०२१च्या ४५व्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सचा PBKS ५ गडींनी पराभव केला.

केकेआरने KKR दिलेले १६६ धावांचे लक्ष्य पंजाबने ३ चेंडू शिल्लक असताना साध्य केले.

पंजाबचा PBKS कर्णधार केएल राहुलने ६७ धावांची शानदार खेळी केली, तर सलामीवीर मयंक अग्रवालने ४० धावांचे योगदान दिले.

युवा फलंदाज शाहरुख खानने व्यंकटेशच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी,नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरच्या ६७ धावांच्या स्फोटक खेळीमुळे कोलकत्ताने २० षटकांत ७ गडी गमावून एकूण १६५ धावा केल्या.

१६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला  कर्णधार राहुल आणि मयंकने शानदार सुरुवात दिली.
सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८.५ षटकांत ७० धावा जोडल्या. वरुण चक्रवर्तीने मायकाला ४० धावांवर बाद केले.

यानंतर फलंदाजी क्रमाने बढती मिळवलेला निकोलस पूरन आपल्या फलंदाजीने काही विशेष चमक दाखवू शकला नाही.

१२ धावा करून तो वरुणचा दुसरा बळी ठरला.अॅडम मार्करामने कर्णधार राहुलसह तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

मार्करामला सुनील नरेनने डावाच्या १६ व्या षटकात शुभमन गिलच्या हाती झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दीपक हुडा (३) झटपट धावा बनवण्याच्या नादात आपली विकेट गमावली.शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ६७ धावा करून राहुल बाद झाला.

आणखी वाचा :Smriti Mandhana:स्मृती मानधना ऐतिहासिक शतक ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी तसेच गुलाबी चेंडूवर शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला.

शाहरुख खान ९ चेंडूत २२ धावांवर नाबाद राहिला.

 

KKR vs PBKS IPL 2021

तत्पूर्वी,नाणेफेक गमावल्यानंतर, फलंदाजीला गेल्यावर,कोलकत्ताची सुरुवात चांगली झाली नाही.

शुभमन गिलने डावाच्या तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या चेंडूवर ७ धावा केल्यावर क्लीन बोल्ड झाला.

यानंतर,क्रिझवर आलेल्या राहुल त्रिपाठी (३४) ने व्यंकटेशसोबत चांगला खेळ केला व दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.

रवी बिष्णोई राहुल बाद केले.६७ धावांची शानदार खेळी खेळून व्यंकटेश रवीचा दुसरा बळी ठरला.

या सामन्यातही इऑन मॉर्गनचा फ्लॉप शो सुरू राहिला व त्याला फक्त २ धावा करता आल्या.नितीश राणाने १८ चेंडूत ३१ धावा केल्या.

केकेआरने KKR शेवटच्या ५ षटकांत ४४ धावा करत ४ विकेट गमावल्या.यामुळे संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही.

 

KKR vs PBKS IPL 2021,संक्षिप्त धावफलक

 

कोलकत्ता नाइट रायडर्स KKR : २० षटकात ७/१६५ ( वेंकटेश आयर ६७, राहूल त्रिपाठी ३४, अर्शदीप सिंग ३/३२)

पंजाब किंग्स इलेव्हन PBKS,: १९.३ षटकात ५/१६८ ( के एल राहुल ६७, मयांक अगरवाल ४०, वरुण चक्रावती २/२४)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles