सर्व छायाचित्रे : कृष्णा शिंदे बीड
बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात झाली आहे. आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होत असून हजारो मोर्चेकरी यात सहभागी होत आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी यावेळी भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. मोर्चाला सुरुवात झाली असून माळीवेस, धोंडीपुरा यामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयकडे कूच करणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणी बरोबरच शेतकऱ्यांचा पिक विमा पिक कर्ज, त्याबरोबरच कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कर्त्यासाठी त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येतेय
.
आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये भाजप नेते सुरेश धस यांच्या नेतृत्वात, मराठा समाजाचा मोर्चा निघाला.
या मोर्चा दरम्यान सुरेश धस यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत त्यांना चॅलेंज केलंय. वडेट्टीवार हा बोगस माणूस आहे. त्यांनी बीड जिल्ह्यात येऊन दाखवावं, मराठा मोर्चा दरम्यान धस आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाले.
येत्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, पुन्हा एकदा एल्गार पुकारु असा इशारा देखील यावेळी धस यांनी दिला आहे. या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते.