नागपूर दि 14 मे प्रतिनिधी
कोरोना नंतर सतावणारा ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस या आजारावरील इंजेक्शन तयार करण्यास वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायेंसेस या कंपनीला एफडीए ने परवानगी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धाच्या जेनेटिक लाइफ सायेंसेस या कंपनी ने कोरोना चे रेमेडिसीवीयर इंजेक्शन चे उत्पादन यापूर्वी सुरू केले आहे.कोरोना काळात ब्लॅक फंगस म्युकरमायकोसिस इन्फेक्शनसाठी एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन निर्मिती करण्यास एफडीएची मान्यता मिळाली आहे. वर्धा येथील पंधरा दिवसांत त्याचे उत्पादन सुरू होईल. सध्या ह्या असलेल्या इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये आहे. आणि जवळपास चाळीस ते पन्नास इंजेक्शन्स रूग्णाला दिली जात आहेत, यामुळे लोकांना ते सहज मिळत नाही. वर्धामध्ये बनविलेले हे इंजेक्शन 1200 रुपयांना मिळणार आहे. जेनेटिक लाइफ सायेंसेस मध्ये दररोज वीस हजार इंजेक्शन्स तयार केल्या जातील .
आणखी वाचा:अक्षय तृतीया सणानिमित्त कोरोना बाधित रुग्णांना मिष्टान्न