बीड
अधिक मास म्हणजे तीन वर्षातून येणारा एक अधिक चा महिना. यंदा हा अधिक मास 17 मे ते 15 जून 2026 पर्यन्त आहे.या अधिक मासात जावयाला दान दिले जाते.याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. या महिन्यात नागरिक पुरूषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.
कुठे आहे भारतात पुरूषोत्तमाचे मंदिर?
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी वसलेले आहे.प्राचीन पुरूषोत्तमाचे मंदिर येथे पाहावयास मिळते.गोदावरी नदी च्या किनार्यावर हे मंदिर आहे.अधिक मासा निमित्ताने मराठवाड्यातील भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.
प्राचीन काळी विशेष म्हणजे भारतातील हे एकमेव मंदिर असून या धार्मिक स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की, पुर्वी शार्दुल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत होता.
भगवान विष्णु यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला व ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले, म्हणून आज देखील हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक्रतीर्थवर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात.
बीड पुरुषोत्तम मास 2026 : पुरुषोत्तमाचे प्राचीन महत्व
या मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे गणपती बाप्पा ची 4 फूटी उंचीची मुर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि महालक्षेक्ष्वराची महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात आहे. असा त्रिवेणी संगम तुम्हाला कुठे ही पाहायला मिळणार नाही. या गाभाऱ्याची प्रतिकृती वृंदावनातील कृष्ण मंदिरातील कृष्ण मंदिराची सारखी आहे. विशेष म्हणजे दोन्ही मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत.
स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना नक्कीच पहाण्याजोगा आहे. असं म्हणतात की, इ.स.वी. 1310 मध्ये रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळेच या मंदिराचं नाव ‘पुरुषोत्तम पुरी’ असं पडलं.
Purushottam Puri अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाच्या शासकीय महापूजा संपन्न
येथे अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाच्या शासकीय महापूजेचा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
भगवान पुरुषोत्तम देवस्थान हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून अधिक मासाला येथे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आमदार प्रकाश सोळंके, एचडी गौरव इंगोले तसेच तहसीलदार संतोष रुईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारात भगवान पुरुषोत्तमाची महापूजा करण्यात आली.
यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
मान्यवरांनी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेत जिल्ह्यात सुख, समृद्धी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.

