घाटसावली येथे भव्य दिव्य स्वागत सोहळा संपन्न
बीड (प्रतिनिधी)
विसाव्या शतकातील महान संत वै. गुरुवर्य सदगुरू किसान बाबा महाराज यांनी सुरू केलेल्या धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे अमृत महोत्सवी 75 वर्ष असून त्या निमित श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे महंत ह भ प गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांचे घाटसावली ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत सोहळा आयोजन करण्यात आले.
धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दि.13 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे .
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक, यांच्या उपस्थित पार पडणार आहे या निम्मित भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शांतीब्रह्म ह भ प गुरुवर्य नवनाथ बाबा महाराज यांनी केले आहे.
दि 13 जानेवारी मंगळवारी रोजी संत महंत च्या व भाविकांच्या उपस्थित ठिक 12 वाजता फुल टाकून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होणार आहे
•13 जानेवारी मंगळवारी संजय नाना धोंडगे नाशिक
•14 जानेवारी बुधवार कविराज झावरे अहिल्यानगर
•15 जानेवारी गुरुवारी संतोष आढावणे बुलढाणा
•16 जानेवारी शुक्रवारी योगीराज महाराज गोसावी पैठण
•17 जानेवारी शनिवारी कृष्णा महाराज चौरे पंढरपूर
•18 जानेवारी रविवारी श्रवण महाराज जगताप विसापूर
•19 जानेवारी चंद्रकांत महाराज खळेकर राहुरी
•20 जानेवारी दुपारी ह भ प अक्रूर महाराज साखरे गेवराई यांचे 12 ते 02 या वेळेत काल्याचे कीर्तन होईल नंतर महाप्रसाद होईल तसेच संध्याकाळी ह भ प रामायणाचार्य पदमकर महाराज देशमुख अमरावती यांचे कीर्तन होऊन रात्रभर हरिजागर व भारुड कार्यक्रम होईल तरी या हरी नामाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांनी केले आहे.

