आव्हाने
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आव्हाने बुद्रुक येथील स्वयंभू निद्रिस्त गणेशाचे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले .
या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर देवस्थान ट्रस्टचे मालोजीराव भुसारी यांनी दिली.
एक दिवसाच्या यात्रा उत्सवामध्ये ह भ प महंत भानुदास महाराज शास्त्री श्रीक्षेत्र राम मंदिर संस्थान गोमळवाडा यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे .तसेच दिवसभर अष्टविनायक ब्लड बँक अहिल्यानगर यांच्या आणि देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी भैरवनाथ भजनी मंडळ आखतवाडे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात असलेली एकतारी भजनाची परंपरा कायम आहे या एकतारी भजनाच्या माध्यमातून जागर करण्याची काम या मंडळामार्फत केली जाते .
रात्री उशिरा या एकतारी भजनाचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी सात वाजता गंगा स्नान व अभिषेक आरती होणार असून सायंकाळी ही आरती आणि महाभिषेक संपन्न होणार आहे.
अंगारकी उपवासाच्या निमित्ताने दुपारी भाविकांसाठी फराळाचे आयोजन आणि सायंकाळी उपवास सोडण्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान मंदिर विश्वस्त अर्जुन सरपते यांच्यासह इतर विश्वस्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

