पाटोदा दि 8 मार्च प्रतिनिधी
सौताडा धबधब्यात आष्टी तालुक्यातील एकाचा मृतदेह सापडला असून हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे.दोन तीन दिवसापूर्वी धबधब्यावरून उडी मारलेली असावी असा प्राथमिक अंदाज असून पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या धबधब्यात सापडलेल्या मृताची ओळख पटलेली असून मृत असलेले इसम वय वर्ष 34 हे आष्टी तालुक्यातील आंधळे वस्ती केरुळ येथील असून ते सध्या एस टी महामंडळ मध्ये मुंबई येथे कार्यरत होते. नेमकी ही आत्महत्या आहे की हत्या?अशी चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा :अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट;संख्या तीनशे पार
रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. आज दिनांक 8 / 3 /2021 रोजी दुपारच्या सुमारास सौताडा येथील फोटो ग्राफर प्रशांत घुले वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना
धबधब्याजवळ दगडा मध्ये अज्ञात मृतदेह पाहण्यास मिळाला.त्यांनी तात्काळ पाटोदा पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. या वेळी पाटोदा पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल तांदळे व तांबे पुढील तपास करीत आहेत.
[…] […]