कार्तिक एकादशीच्या निमित्ताने शाळकरी मुलांना प्रथमच मिळाला पूजेत सहभागी होण्याचा मान

पंढरपूर (सोलापूर): कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची पूजा केली.विशेष म्हणजे या एकादशीला यंदा प्रथमच शाळकरी विद्यार्थ्याना महापुजेला उपस्थित राहण्याची स्नाधी मिळाली आहे.

वारकरी दांपत्याला मानकरी म्हणून सन्मान

या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या वारकरी दांपत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपूरच्या कार्तिकी सोहळ्यात हा सन्मान वारकरी समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

शाळकरी मुलांनाही प्रथमच पूजेत सहभागी होण्याचा मान

यंदा प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही महापूजेला उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली. ही परंपरेतील नवी भर मानली जात आहे.

एकनाथ शिंदे ठरले दोन्ही एकादशीचे मानकरी

विशेष म्हणजे, आषाढी नंतर आता कार्तिकी एकादशीला देखील महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. त्यांनी आपल्या मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा केली.

राज्याच्या कल्याणासाठी साकडे

महापूजेनंतर शिंदे यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना करताना म्हटले की, “राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, बळीराजा सुखी राहो आणि महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर येऊ दे.

साडेपाच लाख भाविकांची उपस्थिती

कार्तिकी एकादशी निमित्त साडेपाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. पहाटेपासूनच चंद्रभागेच्या तटावर भाविकांनी स्थानासाठी गर्दी केली. तसेच नगरपरिषदेच्या शाळा मार्गावरूनही दिंड्या, टाळ-मृदुंगांच्या गजरात विठ्ठलनामाचा निनाद झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles