Homeशिक्षणदहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

लातूर :

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्याचाही समावेश असल्याने जिल्ह्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे . विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करू नये, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना दिले आहेत.

लातूर जिल्ह्यातील दहावीचे ४७ हजार ५५५ आणि बारावीचे ३४ हजार ५१९ असे एकूण ८२ हजार ७४ विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. लातूर तालुक्यात सर्वाधिक ३१ हजार २१४ विद्यार्थी या सवलतीचे लाभार्थी आहेत.

त्यापाठोपाठ उदगीर ११ हजार ७०१, अहमदपूर ८ हजार ६२२, निलंगा ७ हजार ७९९, औसा ७ हजार ४१५, चाकूर ४ हजार ६९४, देवणी ३ हजार १९५, जळकोट ३ हजार १३४, रेणापूर २ हजार ६७० आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एक हजार ६३० विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.


दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी ही सवलत देण्यात आली असून, कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments