राज्य सरकारने हीच योग्य वेळ समजून ओला दुष्काळ जाहीर करावा


आमदार जयंत पाटील यांची विश्रामगृहात पत्रकार परिषद

बीड


बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे या पावसामुळे शेती पिकाचं संपूर्णतः नुकसान झालेला आहे तसेच असंख्य शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून होऊन गेलेली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यास आम्ही मदत देऊ आता हीच योग्य वेळ समजून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना उभारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली .


ते बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी दौऱ्यावर आले असता बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम माजी आमदार संगीता ठोंबरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ऍड पिंपळे मेहबूब शेख राजेसाहेब देशमुख सुशीला मोराळे आधी उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील यांनी अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या शेती तसेच जनावरांच्या प्रचंड नुकसानीबाबत सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. ते म्हणाले की, सरकारने नेहमीपेक्षा चार पावले पुढे येऊन शेतकऱ्यांना मदत करावी. नुकसानीची भरपाई म्हणून प्रति एकर किमान ५० हजार रुपये द्यावेत, त्यापैकी २५ हजार रुपये ताबडतोब शेतकऱ्यांच्या हातात मिळाले पाहिजेत. तसेच, पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींच्या संरक्षणासाठी भिंती बांधून दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मदत करावी अशीही त्यांनी मागणी केली. या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी बीड, शिरूर, पाटोदा या तालुक्यातील दुष्काळ पाणी दौरा केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles