Homeताज्या बातम्या६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६२२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४६ आणि अँटीजेन चाचणीत २९१ रुग्ण बाधीत आढळले.

अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार २०२१ जाहीर 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०३, जामखेड ०४, कर्जत ०६, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ०४, नेवासा ०१, राहुरी ०२, संगमनेर १३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, अकोले ०३, कर्जत ०६, नगर ग्रा.०६, नेवासा १६, पारनेर ०७, पाथर्डी ०५, राहाता ०८, राहुरी १६, संगमनेर १७, शेवगाव १८, श्रीगोंदा २७, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.(४६४)

अँटीजेन चाचणीत आज २९१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले १७, जामखेड १३, कर्जत ०५, कोपरगाव १८, नगर ग्रा. १६, नेवासा १०, पारनेर ८२, पाथर्डी १८, राहाता ०७, राहुरी १८, संगमनेर ०९, शेवगाव ३७, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.(४६४)

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०४,
अकोले १४, जामखेड ०७, कर्जत १९, कोपरगाव ०६, नगर ग्रा. ६०, नेवासा २०, पारनेर १०१, पाथर्डी ४८, राहता २९, राहुरी ४६, संगमनेर ३२, शेवगाव ४५, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.(४६४)

बरे झालेली रुग्ण संख्या:२,६९,२८२

उपचार सुरू असलेले रूग्ण:२६२२

पोर्टलवरील मृत्यू नोंद:५८०१

एकूण रूग्ण संख्या:२,७७,७०५

 

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments