बीड दि 24 मार्च,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये 25 मार्च रात्री बारा ते 4 एप्रिल बारा पर्यंत कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला होता त्याच पद्धतीचा लॉकडाऊन 25 मार्च 4 एप्रिल या दरम्यान राहणार आहे. या पत्रकार परिषदेला बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आर रामास्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
काय असणार आहे या लॉकडाऊनमध्ये
बीड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग हे सर्व कडकडीत बंद असणार आहेत. उपाहारगृह, अनुज्ञप्ती,रेस्टोरेंट,मॉल आणि खाजगी बाजार बंद असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व केशकर्तनालय, ब्युटी पार्लर हे बंद असणार आहेत.
सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून मात्र बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या लोकांना जाता येणार आहे.तसेच इतर जिल्ह्यातून जिल्हा मध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना अँटिजेंन आणि आर टी पीसीआर चाचणी ही सक्तीची असणार आहे.
चित्रपटगृह, व्यायामशाळा, करमणूक केंद्र उद्याने आदी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग हेही बंद असणार आहे.
सर्व मंगल कार्यालय,हॉल,लग्न समारंभ यांच्यावर कडक निर्बंध घालण्यात आले असून तेही बंद असणार आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा,मनोरंजन, संस्कृती या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली असून 25 मार्च 4 एप्रिल पर्यंत कोणालाही अशा कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. खाजगी कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आली असून प्रशासनाने वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य दिले आहे.
आणखी वाचा:बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी करणार निर्णय जाहीर
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी सात ते दहा या वेळेमध्ये भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विकता येईल त्यामध्ये त्याने एका जागेवर न थांबता फिरुन हा भाजीपाला विकणे आवश्यक आहे. लसीकरण मोहीम ही या कालावधीमध्ये चालू असणार असून तसेच तपासणी चाचणी सुरू असणार आहेत या कालावधीमध्ये ज्यांना लसीकरण घ्यायचे असेल त्यांनी दवाखान्यात जाण्यापूर्वी आपले लसीकरण याचा संदेश दाखवणे गरजेचे आहे. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एकच पेट्रोल पंप चालू राहणार आहे.तसेच बीड येथील काही पेट्रोल पंप 24 तास चालू असणार असून तालुक्याचे ठिकाणी एकच पंप सुरू ठेवला जाणार आहे.अंत्यविधी साठी फक्त 20 नागरिकांना अनुमती राहणार आहे.
या टाळेबंदीच्या बंधनाचे पालन करणे नागरिकांना अत्यावश्यक असणार आहेत.
[…] […]