Homeताज्या बातम्याआयशर मेटेडोर उलटला; १५ मजूरांचा मृत्यू

आयशर मेटेडोर उलटला; १५ मजूरांचा मृत्यू

 

यावल दि 15 फेब्रुवारी, प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळ पपई भरून येणारी आयशर मेटेडोर उलटली आहे. यात १५ मजूरांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. डी वाय एस पी पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातात दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत वृत्त असे की नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केन्हाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी अपघातस्थळ गाठले असून त्यांनी त्यांनी अपघाताबाबत दुजोरा दिला आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा:पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग आजपासून सुरु होणार

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments