अहमदनगर
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय तील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून ही संख्या 83 झाली आहे.
सोमवारी सायंकाळी 12 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यामध्ये 8 मुली आणि 4 मुलांचा समावेश आहे.
या शाळेत शनिवारी कोरोना बाधित होण्याची मालिका सुरु झाली. शनिवारी १९ विद्यार्थी बाधित आल्यानंतर शाळेतील इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये रविवारी सकाळी 33 विद्यार्थी बाधित आढळले. त्यानंतर इतर चाचणी केलेल्या विद्यार्थ्यांचे सायंकाळी अहवाल आले. त्यामध्ये आणखी १९ विद्यार्थ्यांचा अहवाल बाधित आला त्यामुळे एकूण संख्या ७१ झाली होती. सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालात १२ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय
navodaya vidyalaya दरम्यान हा संसर्ग कसा झाला याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. या सर्व बाबीवर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटविकास अधिकारी किशोर माने हे लक्ष ठेऊन आहेत.या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या शाळेला जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली.