जवाहर नवोदय विद्यालयातील आणखी 33 विद्यार्थी कोरोना बाधित

जवाहर नवोदय

 

 

in article

अहमदनगर

जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यामध्ये आणखी 33 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 52 झाली आहे.

 

 

इयत्ता दहावी व बारावीची अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालय मध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. त्यानंतर शाळेतील सर्वांची चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण  428 पैकी 33 व्यक्ती बाधित आढळून आल्या. आजपर्यंत हि संख्या 52 झाली आहे. त्यापिकी ४७ बाधित हे पारनेर येथील आरोग्य केंद्रात उपचार घेत असून उर्वरित खाजगी मध्ये उपचार घेत आहेत.

जवाहर नवोदय एकूण संख्या झाली 52

या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोणाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आल्याने उर्वरित विद्यार्थी तपासणी शुक्रवारी सकाळी केली असता १० विद्यार्थ्यांना कोरोना बाधित व एका संगीत शिक्षकाला गुरुवारी बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे या १९ जणांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने  उपचारासाठी दाखल केले आहेत.

 

या सर्व बाबीवर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटविकास अधिकारी किशोर माने हे लक्ष ठेऊन आहेत. जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

shirdi sai साईबाबा संस्थान ने घेतला हा निर्णय

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ओमिक्रोन चे दोन रुग्ण सापडल्याने प्रशासन गंभीर पणे हे प्रकरण हाताळत आहे. याचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने सर्वच जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदीची घोषणा केली आहे. त्यातच जिल्ह्यातील संख्या वाढत असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.

नगर बीड परळी रेल्वेसाठी राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here