केंद्रीय रेल राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा उद्या शुभारंभ

केंद्रीय रेल राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा शुभारंभ

अहमदनगर-

in article

न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा रेल राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ होणार असल्याचे
रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रावसाहेब दादाराव पाटील दानवे, माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या आदरणीय उपस्थितीत अहमदनगर- न्यू आष्टी आणखी एक नवीन डेमू (DEMU) रेल्वे सेवेला अहमदनगर रेल्वे स्टेशन स्थानकाहून, दि. 17.11.2022 रोजी दुपारी 3.30 वा. ला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार . सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार श्रीमती रजनी पाटील, यांच्यासह विधान परिषद सदस्य सुरेश धस, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार महापौर श्रीमती रोहिणी शेंडगे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी आष्टी येथून पहिल्या आष्टी नगर डेमु रेल्वेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला होता.
• डेमू (DEMU) सेवा न्यू आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.
• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.
• यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक कॉलेज तथा शाळांमध्ये येण्या- जाण्याचे सोयीस्कर होईल तसेच अन्य शहरांसाठी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.
• गाडी क्रमांक 01403 अहमदनगर – न्यू आष्टी, अहमदनगर हून दुपारी 03.40 वा. ला सुटणार आणि नारायणडोहो आगमन 04.40 प्रस्थान 04.42, न्यू लोणी आगमन 04.58 प्रस्थान 05.00, सोलापूरवाडी आगमन 05.25 प्रस्थान 05.27, न्यू धानोरा आगमन 05.43 प्रस्थान 05.45, कडा आगमन 05.55 प्रस्थान 05.57 आणि न्यू आष्टी सायंकाळी 06.30 वा. ला पोहचेल.

• गाडी क्रमांक 01404 न्यू आष्टी- अहमदनगर, न्यू आष्टीहून सायंकाळी 07.00 वा. ला सुटणार कडा आगमन 07.28 प्रस्थान 07.30, न्यू धानोरा आगमन 04.40 प्रस्थान 07.42, सोलापूरवाडी आगमन 07.58 प्रस्थान 08.00, न्यू लोणी आगमन 08.25 प्रस्थान 08.27, नारायणडोहो आगमन 08.53 प्रस्थान 08.55 आणि अहमदनगरला रात्री 09.45 वा. ला पोहचेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here