मुंबई
राज्यात आज ओमायक्रोन सर्वेक्षण बद्दलची माहिती प्राप्त झाली आहे.
आज राज्यात ओमायक्रोन संसर्गाचे एकतीस रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये मुंबईमधील 27 ,पुणे ग्रामीण आणि अकोला प्रत्येकी एक असे एकूण 31 रुग्ण ओमायक्रोनचे पॉझिटिव्ह आले आहेत.
यामुळे आता राज्यात व ओमिक्रॉन बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 141 इतकी झाली आहे.
ओमायक्रोनबाधित राज्यातील रुग्णांमध्ये
मुंबई 73, पिंपरी-चिंचवड 19, पुणे ग्रामीण 16, पुणे मनपा सात,
सातारा उस्मानाबाद प्रत्येकी पाच ,ठाणे मनपा तीन, कल्याण डोंबिवली नागपूर औरंगाबाद प्रत्येकी दोन,
लातूर बुलढाणा अहमदनगर अकोला वसई-विरार नवी मुंबई मीरा भाईंदर प्रत्येकी एक एकूण 141 रुग्ण आढळले आहेत.
चार रुग्ण गुजरात, तीन रुग्ण कर्नाटक, दोन रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी एक रुग्ण छत्तीसगड उत्तर प्रदेश जळगाव ठाणे नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत.
2 रुग्ण विदेशी नागरिक आहेत.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळून आले आहेत.
यापैकी 61 जणांना त्यांची rt-pcr चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळून आलेल्या 31 omicrone रुग्णांची सर्वसाधारण माहिती अठरा वर्षावरील सहा,
साठ वर्षावरील तीन, सतरा पुरुष, 14 स्त्रीया, 30 जणांचा अंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास तर
एक निकट सहवासात. 18 वर्षाखालील सहाजण आणि इतर तीन जण वगळता 22 जणांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
यातील 29 जणांना कोणतेही लक्षणे नाहीत .तर दोन जणांना सौम्य लक्षणे जाणवत आहेत.अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.