अहमदनगर दि 16 मार्च ,प्रतिनिधी
जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७२, जामखेड ०७, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०५, पारनेर ०५, राहाता २३, राहुरी ०५, संगमनेर १५, शेवगाव ३८, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६६, अकोले १०, जामखेड ०३, कर्जत ०२, कोपरगाव १५, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०७, पारनेर ०५, पाथर्डी ०७, राहाता ३८, राहुरी ११, संगमनेर २८, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ६३ जण बाधित आढळुन आले. मनपा २३, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०१, नेवासा ०३, पारनेर ०१, राहाता १६, राहुरी ०५, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०५, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात एकूण ३३७ बरे होऊन घरी परतले.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा १०३, अकोले ०७, जामखेड ०५, कर्जत ०३, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ११, नेवासा १७, पारनेर ११, पाथर्डी ०८, राहाता ५३, राहुरी १०, संगमनेर ३९, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आणखी वाचा :सौताडा धबधब्यात येथे एकाचा मृतदेह सापडला; खून की आत्महत्या
*बरे झालेली रुग्ण संख्या:७७६०२*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२६८१*
*मृत्यू:११८०*
*एकूण रूग्ण संख्या:८१४६३*
[…] […]