नवी दिल्ली-प्रतिनिधी
yo yo honey singh याची पत्नी शालिनी तलवार हिने पती हनीसिंग याच्या विरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केल्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने त्यास नोटीस बजावली आहे.
तीस हजारी कोर्टाच्या मुख्य मेजिष्ट्रेट तानिया सिंग यांनी ही नोटीस जारी केली असून २८ ऑगस्ट रोजी याची सुनावणी ठेवण्यात आली आहे.
प्रतिवादी हनीसिंग आणि इतरांनी तिचा छळ केला असल्याचा आरोप तिने आपल्या पतीविरुद्ध केला आहे. लग्नानंतर यो यो हनीसिंग याने मानसिक लैंगिक आर्थिक आणि शाररीक छळ केला असल्याचे फिर्यादीचा आरोप आहे. तर या पोटी 20 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी तिने केली आहे.
आणखी वाचा : बीड अहमदनगर जिल्ह्यासह ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम
वकील संदीप कपूर यांच्यासह त्यांचा चमू फिर्यादींच्या बाजूने काम पाहत आहेत.yo yo honey singh wife filed case of domestic violence