जामखेड दि 11 फेब्रुवारी, प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पक्षाने बाजी मारल्याचे दिसत असताना वंचित बहुजन आघाडी यामध्ये मागे नाही.जामखेड तालुक्यातील बाळेगव्हाण ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडीने झेंडा फडकवला आहे.
डॉ.अरुण जाधव वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढली गेली.
या ग्रामपंचायतीमध्ये 7 उमेदवारांपैकी 4 उमेदवार निवडून आले व वंचित बहुजन आघाडीला एक हाती सत्ता मिळाली, यावेळी सरपंच पदी वीजबाई खाडे व उपसरपंच पदी राहुल गोपाळघरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सर्जेराव गंगावणे व मंगलबाई दाताळ यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली.
बापूसाहेब ओहोळ,दादासाहेब दाताळ, गणपत कराळे, विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली.
या ग्रामपंचायतीमध्ये 7 उमेदवारांपैकी 4 उमेदवार निवडून आले व वंचितबहुजन आघाडीला एक हाती सत्ता मिळाली. यावेळी सरपंच पदी वीजबाई खाडे व उपसरपंच पदी राहुल गोपाळघरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली व सर्जेराव गंगावणे व मंगलबाई दाताळ यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली.
यावेळी प्रतीक बारसे, अतिश पारवे, ज्ञानदेव गोपाळघरे,कचरू पौडमल, आण्णासाहेब गोपाळघरे, आण्णा पवार फौजी, विनोद खाडे, गोरख आगे गणपत कराळे, भरत दराडे, बाबा शिकारे, नामदेव खराटे, विलास गोपाळघरे, धीरज गोपाळघरे, बाजीराव गंगावणे, आश्रुबा गंगावणे, ज्ञानदेव गोपाळघरे, गंगाबाई गायकवाड ,पवित्राबाई वारभवन, मच्छिंद्र जाधव, अरुण डोळस, संतोष चव्हाण, सागर भांगरे, सचिन भिंगारदिवे, राकेश साळवे वैजीनाथ केसकर इत्यादींचे सहकार्य लाभले.
हेही वाचा:काय आहे happy hug day 2021;सविस्तर वाचा
[…] […]