नगर कल्याण महामार्गावर विचित्र अपघातात सहा ठार

पारनेर ,
six dies nagar kalyan accident अहमदनगर- कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाट्यावर बुधवारी पहाटे  २.३० ते ३ दरम्यान एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

ढवळापुरी फाट्यानजीक एसटी बस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला असुन या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी हद्दीत भयानक अपघात ६ जणांचा मृत्यू झाला.

in article

या अपघातांतील मयतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातील तर तिघेजण संगमनेर तालुक्यातील एक जण पाथर्डी तालुक्यातील आहे.तर स्थानिक तरुण मदत करत असताना पत्रा लागल्याने १ जण जखमी झाला आहे.

या अपघातात निलेश रावसाहेब भोर -दसवडे प्रकाश रावसाहेब थोरात-वारणवाडी ( ता- पारनेर )अशोक चिमा केदार  जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी-जांबुत खुर्द ( ता – संगमनेर) सचिन कांतीलाल मंडलीचा-टाकळी मानूर ( ता- पाथर्डी ) हे मयत झाले आहे तर भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.

या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एसटी चा पत्रा लागल्याने सुयोग अडसूळ -जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळतात साह.पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनाही दाखल होऊन पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहांची उत्तरीय तपासणी होणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ५ जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर इथं उपचार सुरू असताना मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम पाणी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here