‘कोव्हिशिल्ड’ लसीचे अखेर पुणे येथून वितरण सुरू

- Advertisement -
- Advertisement -

‘कोव्हिशिल्ड’ लसीचे अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया पुणे येथून वितरण सुरू

पुणे दि 12 प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला पुणे येथून वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन कंटेनर हे पोलिसांच्या बंदोबस्तासह पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, त्याआधी इन्स्टिटयूटच्या परिसरात या कंटेनरची पूजा करण्यात आली. परि मंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून या कंटेनर्सना मार्गस्थ करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला.

पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद,  गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी ८ वाजता रवाना होणार आहे. ८ फ्लाईटपैकी २ फ्लाईट  कारगो असून यातील  कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे.

हेही वाचा:सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ यांचा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles