Homeताज्या बातम्याआर.एस.पी. जिल्हा समादेशक प्रकाश मिंड यांचा श्रीगोंदा दौरा संपन्न; पोलीस निरीक्षक सुभाष...

आर.एस.पी. जिल्हा समादेशक प्रकाश मिंड यांचा श्रीगोंदा दौरा संपन्न; पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांचा सत्कार

ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा

श्रीगोंदा,
shrigonda police news आर.एस.पी.अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा समादेशक प्रकाश मिंड यांचा श्रीगोंदा तालुका दौरा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला भेट देऊन नूतन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी आर.एस.पी. विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान आर.एस.पी. विभागाचे कार्य, विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियंत्रण, रस्ते सुरक्षेचे नियम तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. या दृष्टीने आर.एस.पी.चे कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि महत्त्वपूर्ण आहे.”

आर.एस.पी.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारीची भावना, वाहतूक नियमांचे ज्ञान आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी आर.एस.पी. जामखेड तालुका उपसमादेशक किशोर सोलाट, श्रीगोंदा आर.एस.पी. अधिकारी सुयोग धस यांच्यासह आर.एस.पी. विभागाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे पोलीस विभाग आणि आर.एस.पी. यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या कार्याला निश्चितच बळ मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments