वहिनीच्या हत्येप्रकरणी चुलत दिराला जन्मठेप

ऋषिकेश भास्कर सांगळे
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी

दि २२ डिसेंबर २०२५ | श्रीगोंदा / पुणे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील साकुर्डे गावात २०१७ साली घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी चुलत दीराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धुळा बाबा गोरड (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे.

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून आरोपीने आपल्या वहिनी सुमनबाई गोरड यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुमनबाई यांच्या डोक्यावर दगड व लोखंडी पाईपने वार करून त्यांचा खून करण्यात आला. तसेच गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरून ठेवण्यात आला होता.

दरम्यान, सुमनबाई यांचा मुलगा आनंद हा श्रीगोंदा येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वास्तव्यास होता. आई अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासात हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात मा. सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून १५ हजार रुपयांचा दंड तसेच पीडित मुलाला ३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

(स्रोत : न्यायालयीन निकाल / ऑनलाईन वृत्त)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles