शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनासाठी शिर्डीत राज्यभरातून 22 हजार पदाधिकारी येणार

shirdi

shirdi bjp maha adhiveshan2025 विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर साईनगरीत आज रात्री भाजपाच्या कोर कमेटीची बैठक पार पडली असुन भाजपचं महाविजयी अधिवेशन सकाळी सुरवात होईल. राज्यातून तब्बल 22 हजार पदाधिकारी या अधिवेशनाला येणार आहेत.

आगामी निवडणुका व भाजपाचा मोठ्या प्रमाणावर विस्तारणारा परिवार या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. पक्षाच्या पुढील अध्यक्षाचीही या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी पक्षाचा ध्वज फडकावून व प्रतिमा पूजनाने अधिवेशनाचा श्रीगणेशा होईल तर  सायंकाळी पाच  अमिक शहांच्या भाषणाने समारोप होईल.त्या आधी ग्रुहमंत्री अमित शाह हे शनि शिंगणापूर व साई समाधीचे दर्शन घेतील.

अधिक वाचा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंचा आज 427 व्या जन्मोत्सव सोहळा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. शाह यांच्या हस्ते संविधान पूजनही करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. मंडप, स्टेज, बैठक, भोजन, वाहनतळ, निवास, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी दिलेल्या पत्रकात सांगितलं आहे. त्यामुळं आमदार रवींद्र चव्हाण आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. 

शिर्डी इथं आज भाजपचं महाविजयी अधिवेशन संघटनात्मक बैठकीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजप राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मोर्चा प्रदेश अध्यक्ष आदी उपस्थित होते. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles