अहमदनगर:दि १५ जानेवारी, प्रतिनिधी
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह,काव्यसंग्रह,आत्मचरित्र,लेखसंग्रह,कादंबरी,बालवाड्मय,संशोधन ग्रंथ,समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.
पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंधसाहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.यावर्षी “ पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंधसाहित्य संमेलन” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
सन २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती,परिचय,पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे ३१ जानेवारी २०२१ पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद,फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,तपोवन रोड,सावेडी,अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे असे आवाहन सुभाष सोनवणे, भगवान राऊत,किशोर डोंगरे,प्रा.अशोक कानडे,अजयकुमार पवार,बबनराव गिरी,शर्मिला गोसावी, सुनील गोसावी,राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
हेही वाचा :आघाडी सरकार आणि त्यांच्या लोकप्रतिनिधीने पिंपरकणे पूल रखडविला