साईबाबांच्या 104 वा पुण्‍यतिथी उत्सवास शिर्डीत आजपासून प्रारंभ

saibaba shirdi
saibaba shirdi

शिर्डी

saibaba shirdi साईबाबांच्या १०४ वा पुण्‍यतिथी उत्सवास शिर्डीत आज प्रारंभ झाला. हा उत्सव 04 ऑक्‍टोबर ते शुक्रवार दिनांक 07 ऑक्‍टोबर 2022 या कालावधीत shirdi sai live  साजरा करण्‍यात केला जात आहे.

in article

श्री साईबाबा saibaba पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी विणा, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी आणि रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व सामान्‍य प्रशासन प्र.अधिक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेवुन सहभाग घेतला.

daund manmad mega block दौंड मनमाड दरम्यान 9 दिवसांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक;गाड्या रद्द

उत्सवानिमित्त श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास सुरवात झाली. यावेळी प्रथम व व्दितिय अध्यायाचे वाचन संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.समाधी मंदिरात saibaba temple तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.दिपाली भोसले यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली.

श्री साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह saibaba samadhi date ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ०५ ऑक्‍टोबर २०२२ रोजी समाधी मंदिर saibaba temple near me दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे.

श्रींच्या उत्‍सवानिमित्‍त मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व सर्व धर्म समभाव आणि स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव यावर आधारित “श्री साई दरबार” हा भव्‍य देखावा तयार करण्यात आला तसेच हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त ए.महेश रेड्डी यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

यावेळी प्रातांधिकारी गोविंद शिंदे, तहसिदार कुंदन हिरे, मुख्‍य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आणासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here