roll ball sport विभागीय रोलबॉल स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या मुला-मुलींच्या संघाला उपविजेतेपद

roll ball sport
roll ball sport

विभागीय रोलबॉल स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या मुला-मुलींच्या संघाला उपविजेतेपद

श्रीरामपुर (गौरव डेंगळे)

in article

roll ball sport क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व सेंट झेवियर स्कूल श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभागीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

१४,१७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या या स्पर्धेमध्ये नगर ग्रामीण,नगर शहर,पुणे ग्रामीण, पुणे शहर,पिंपरी चिंचवड, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर या जिल्हा विजयी संघांनी सहभाग नोंदवला होता.rolling ball game

नगर ग्रामीण संघाचे नेतृत्व करताना न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे शहराविरुद्ध पराभव पत्करावा लागला व स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात पुणे शहराच्या संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात नगर ग्रामीण संघाचा पराभव केला.

उपविजेतेपद पटकावल्याबद्दल दोन्ही संघांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम टेकावडे,जन्मजय टेकावडे, सुरेश ओझा,प्राचार्या जयश्री पोडघन,प्राचार्या डॉ योगेश पुंड, क्रीडा प्रशिक्षक गौरव डेंगळे तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. यशस्वी संघाला रोलबॉलचे तज्ञ प्रशिक्षक नितीन गायधने यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here