राज्यातील शेतकरी कुटुंबातील युवतीसाठी श्रद्धा रोल माँडेल ठरेल-पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
निघोज दि 17 एप्रिल प्रतिनिधी
80 म्हशींचा गोठा संभाळणारी श्रद्धा सतीश ढवण हीच्या बद्दलची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी थेट श्रद्धा च्या घरी भेट देऊन तिच्या गोठ्याची पाहणी केली. यावेळी श्रद्धाने आपल्या कामाची माहिती केदार यांना दिली .यावेळी त्यांच्या समवेत कन्हैया उद्योग समुहाचे संचालक मच्छिंद्र लंके यांच्यासह प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केदार यांनी सांगितले की राज्यातील शेतकरी कुटुंबातील युवतीसाठी श्रद्धा रोल माँडेल ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सुनील केदार यांनी आजच्या निघोज दौर्यात पारनेकरांना जनावरांच्या फिरत्या दवाखान्याची भेट दिली.
माहीती व तंत्रज्ञानाच्या युगातही एक शेतकरी कुटुंबातील मुलगी वडीलांच्या संसाराला हातभार लावते हे आभिमानास्पद असल्यानेच तीचे कार्य व काम करण्याची पद्धत समजावुन घेत तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी मी आलो.आणि धन्य झालो. उद्योग व्यवसाय कुठलाही असो त्याला माहीती व तंत्रज्ञानाची जोड दिली तर निश्चितच यशस्वी होतो हे या युवतीने दाखवुन दिले असे केदार म्हणाले.
आणखी वाचा: जिल्ह्यात पुन्हा 14 दिवसांचा जनता कर्फ्यु लावणार?पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती