लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार,आरोपी अटकेत

लग्नाचे आमिष

 

अहमदनगर दि 19 मार्च ,प्रतिनिधी

in article

लग्नाचे आमिष दाखवून आष्टी तालुक्यातील शिक्षिकेवर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित शिक्षिकेने दिली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सदरचा आरोपी हा न्यायालयामध्ये क्लार्कचे काम करत असून शिक्षिका नगरमध्ये राहत आहे.ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात नोकरीस आहे. या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र
राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने रात्रीच आरोपी सोनवणे याला राहाता येथून अटक केली.
फिर्यादी महिलेचे काही दिवसांपूर्वी आरोपी सोनवणे सोबत ओळख झाली होती. फिर्यादीने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी लग्नही केले. मात्र फिर्यादी यांनी सोनवणेकडे कायदेशीर पद्धतीने लग्न करण्याची अट घातली.दरम्यानच्या काळात सोनवणे याने त्याच्या आई वडिलांना माहिती दिली. सोनवणे याच्या आई वडिलांनी फिर्यादी शिक्षिकेला मारहाण केली. आरोपी सोनवणे याने फिर्यादी शिक्षिकेस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत शिक्षेकेने
आरोपी सोनवणे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे
करीत आहे.
आणखी वाचा:*जिल्हा कारागृहे,रुग्णालये कोरोना बाधित;संख्या 266

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here