rang Panchami लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन

rang Panchami 2022
rang Panchami 2022

मढी

 

in article

rang Panchami 2022 श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसापासून नाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.kanifnath madhi yatra सुरु झाली ही यात्रा गुढी पाडव्यापर्यंत चालणार आहे.

आज रंगपंचमीच्या दिवशी सुरु झालेल्या यात्रोत्सवात लाखो  भाविकांनी कानिफनाथांचा जयघोष करत दर्शन घेतले. मंदीराच्या कळसाला काठ्या भेटवून यात्रोत्सावास सुरुवात झाली.

 

कोरोना नंतर सुरु झालेल्या यात्रेसाठी अभूतपूर्व भाविकांची मांदियाळी पहावयास मिळाली. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यात्रा Kanifnath Yatra Madhi march 2022 भरली.नाथांच्या दिंड्यांनी एक दिवस अगोदर पासून गर्दी केली.

नाथांच्या गडाच्या पायथ्याशी दिंड्यानी आपला डेरा टाकला होता.

 

 

rang panchmi 2021 date कळसाला रंगीबेरंगी काठ्या भेटविण्याची प्रथा

 

सकाळपासून मंदिराच्या कळसाला रंगीबेरंगी काठ्या भेटविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. वाजत गाजत डफ आणि हलगी वाजवत भाविक नाथांची काठी डोक्यावर घेऊन मंदिराकडे येत होते.

त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.त्यामुळे मंदिराच्या पायऱ्या भाविकांनी फुलून गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर भाविक परतत होते.

तर काही भाविक रात्री उशिरा पर्यंत थांबून दुसर्या दिवशी पैठण येथे संत एकनाथांचा षष्टी चा उत्सव असल्याने भाविक एक परिक्रमा पूर्ण करतात.

दिवसभर दर्शन आणि रात्री यात्रेचा आनंद घेऊन भाविक षष्टी साठी पैठण ला रवाना होतात.

यात्रेच्या निमित्ताने नाथांचे मंदिर २४ तास उघडे ठेवण्यात आले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर देवस्थान, पाथर्डी पोलीस, ग्रामपंचायत मढी,तहसीलप्रशासन कार्यरत आहेत.

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कानिफनाथ देवस्थान समितीच्या वतीने भक्तांच्या स्वागतासाठी चोख व्यवस्था केली असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड व कोषाध्यक्ष बबन मरकड यांनी दिली .

rang panchami गाढवांचा बाजार

या यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा गाढवांचा बाजार होय. गुजरात ,काठेवाड येथून त्याच बरोबर दक्षिण भारतातून खेचर गाढवं याठिकाणी आणली जातात.

यातून मोठा  व्यवहार या बाजारातून होतो.यंदा कोरोना नंतरची यात्रा असल्याने बाजारात गाढवांची संख्या कमी झाली होती. सरासरी ५० हजार पर्यंत किमती असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. कोरोना मुळे ही संख्या रोडावली असल्याचे दिसले.

madhi yatra मंदीराच्या कळसाला भेटवण्यासाठी काठ्या  घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली. पैठण (उत्तर बाजुच्या ) दरवाज्यातून एका काठी सोबत केवळ दहा भाविकांना गडावर सोडण्यात आले . या सोहळ्यासाठी  दीडशे सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

या शिवाय एखादे वाहन वाहतुकीत अडचण ठरल्यास ते काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख केली असून  वॉटर स्टंडचे नळ द्वारे पाणी पुरवले जात आहे .

चोरी ,वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस मित्र , देवस्थान कर्मचारी , पोलीस  जागोजागी तैनात आहेत . संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून रुग्णवाहिकेची सुविधा करण्यात आली.

या यात्रेत पशुहत्या होऊ नये यासाठी एक पथक देवस्थान समितीच्या वतीने तैनात करण्यात आले आहे.

परिवहन मंडळाने गडाच्या पायथ्याला एस टि स्टॅन्ड सुरु केले असून नाथांच्या दर्शनानंतर षष्टी साठी पैठण ला जाणाऱ्या भाविकांसाठी मढी ते पैठण अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे.

या यात्रेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ७७ जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

rang Panchami 2022 रंगपंचमीच्या यात्रेचा इतिहास

गावात मानाची होळी पेटविल्यानंतर भटके समाज इथे येण्यास सुरुवात होतो.सर्व भटक्या समाजाचे स्थान म्हणून याचा उल्लेख केला जातो,.

नाथ सांप्रदायातील या ठिकाणाचे मंदिर बांधण्यासाठी या भटक्या समाजाचे मोठे योगदान असल्याने त्यांना मानाचे स्थान दिले आहे.

होळी ही गोपाळ समाज पेटवतो तर मानाची काठी टेकवून यात्रा सुरु करण्याचा मान कैकाडी समाजाला आहे. त्यानंतर इतर मानाच्या काठ्या टेकविल्या जातात, आणि त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते,

या यात्रेला भटक्या समाजाचे सर्व लोक एकत्र  येतात,आणि रोटी बेटी व्यवहारही इथे होतात. या यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा गाढवांचा बाजार होय. गुजरात ,काठेवाड येथून त्याच बरोबर दक्षिण भारतातून खेचर गाढवं याठिकाणी आणली जातात यातून मोठा  व्यवहार या बाजारातून होतो.

यात्रेतील वैशिष्टे म्हणजे इथे मिळणारी गुळाची चविष्ट रेवडी. ही नाथांचा प्रसाद म्हणून भाविक घरी घेऊन जातात.

देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड ,कोषाध्यक्ष बबन तात्या मरकड , सचिव विमलताई मरकड , विश्वस्त भाऊसाहेब मरकड शामराव मरकड , रवींद्र आरोळे , देवस्थान विश्वस्त व कर्मचारी पोलीस मित्र ग्रामपंचायत कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here